Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“…आवाज दिल्लीला पोहोचला पाहिजे”; महामोर्चात अजित दादा कडाडले

Mumbai : (Mahavikas Aghadi Mahamorcha Mumbai) महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात विरोधी पक्षेनेते अजित पवार (Mahavikas Aghadi Mahamorcha Mumbai Ajit Pawar NCP) चांगलेच कडाडले आहेत. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार महाराष्ट्राला, लोकांना जी वागणूक देत आहे. त्यावरून तसेच माह्पुरुशांचा अपमान आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून अजित पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. (MAHAVIKAS AGHADI MAHAMORCHA, AJIT PAWAR MAHARASHTRA MUMBAI)

काय म्हणाले अजित दादा?

“मागच्या आठवड्यात राज्यपाल पंतप्रधानांसोबत बसलेले आपण पाहिले. भाजपाचा खरा चेहरा समोर आला. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं वक्तव्य केलं. त्यामुळे देशाच्या महापुरुषाचा अपमान करण्याचं धाडस भाजपानं केलं. आज तिरंग्यात सगळा महाराष्ट्र एकत्र आलाय, हे चित्र आजच्या मोर्चात पाहायला मिळत आहे. राज्यपाल भवनातून महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान करण्याचं काम केलं गेलं. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कळस गाठला. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्यांच्या अवमानाचं काम भाजपाकडून केलं गेलं.”

“राज्यपालांना हटवलं पाहिजे. दोषी असणाऱ्या आमदारांना हटवलं पाहिजे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पावलं उचलायला हवीत. त्यासाठी कायदा केला तरी चालेल, विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देतील. बेळगाव, निराणी, कारवारसह सीमाभागातील ८६५ मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातील गावं अचानक कर्नाटकमध्ये जाण्याचं का जाहीर करू लागले. याचं टूलकिट कुठून जारी झालं? याचा नागरिकांनी विचार करायला हवा. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काम केलं. पण कधी सीमाभागातील गावं असं म्हणत नव्हती. देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे. या मातीला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा आहे.”

“माणसाची चूक एखाद्या वेळी होते. चूक झाल्यावर माफी मागणं ही आपली महाराष्ट्र संस्कृती आहे. मराठी माणसावर तसे संस्कार केले आहेत. पण तसं घडत नाही. राज्यपाल बोलल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे दुसरे मंत्री बोलतायत. यांना जनाची नाही, मनाची काही वाटायला पाहिजे. तुम्ही राज्यपाल म्हणून बसलायत. पण याचा विसर राज्यकर्त्यांना पडलाय. ही वेळ का यावी? महापुरुषांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं सुरू आहे. त्याला विरोध केलंं पाहिजे. शिवाजी महाराज आपलं दैवत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक महापुरुषांची नावं आपल्याला घेता येतील. पण यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं काम कशासाठी चाललंय? कोण यामागचा मास्टरमाईंड आहे? का हे थांबत नाहीये.”

“महाराष्ट्राच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप असला, तरी महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो. मग ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे. महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी, महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी आपण हा मोर्चा काढला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये