अजित पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार; म्हणाले, “राज्याच्या विकासासाठी…”

पुणे | Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या विकासामध्ये नेहमीच सहकार्य करतात, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज (1 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे आणि पिंपरी चिंडवडमधील विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम मदत करत असतात. त्यांच्या मदतीचा फायदा राज्यातील 14 कोटी जनतेला होत आहे. तसंच पंतप्रधान मोदी हे पुण्याच्या विकासामध्ये देखील नेहमी सहकार्य करत असतात.
पुढे बोलताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. पंतप्रधान हे विकास कामांसाठी नेहमी सहकार्य करतात आणि प्रोत्साहनही देत असतात. तसंच पंतप्रधान मोदी हे सर्वांच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे अजित पवारांनी आभार मानले.