ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

“Tiger Is Back, आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री…”, अजितदादांच्या ‘त्या’ बॅनरनं वेधलं सर्वांचंच लक्ष

पुणे | Ajit Pawar – अजित पवार (Ajit Pawar) हे राज्य सरकारसोबत गेल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात अनेक विरोधकांनी देखील एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) जागी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाणार असल्याचे दावे केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर काही दिवसांपूर्वी अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. तर आता अजितदादांचा उद्याचे मुख्यमंत्री म्हणूनच बॅनर झळकला आहे. सध्या या बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

बुधवारी राज्यातील पालकमंत्री पदाचे वाटप झाले. यामध्ये अजित पवार हे पुण्याचे पालमंत्री झाले आहेत. तर यापार्श्वभूमीवर पुण्यात अजितदादांचं एक बॅनर झळकलं असून त्या बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. “Tiger Is Back…आजचे पालकमंत्री उद्याचे मुख्यमंत्री”, अशा आशयाचं पोस्टर पुण्यात झळकलं आहे. हे पोस्टर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून लावण्यात आलं आहे. हे बॅनर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी लावलं आहे. सध्या या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं असून ते चांगलंच चर्चेत आहे.

image 1

दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. तर चंद्रकांत पाटील यांची सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री केल्यामुळे चंद्रकांतदादा नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये