अजित पवार यांनी केला महिला चालवित असलेल्या रिक्षाने प्रवास
जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले होते. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापासून त्यांनी महिलेच्या रिक्षातून प्रवास केला. जाहीर भाषणातून या महिलेचे कौतुक केले.
निगडी ते पिंपरीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर एच.ए.मैदानावर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, पार्थ पवार, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, नाना काटे यावेळी उपस्थित होते.
मी तुमचा भाऊ आहे. सावत्र भावांपासून सावध रहावे. सावत्र भाऊ खोटे-नाटे सांगत आहेत. हौसेगवसे-नवसे काहीपण बोलतात. त्याचा महायुतीला फटका बसतो. मी अर्थमंत्री म्हणून सांगतो लाडक्या बहिणीची ही ओवाळणी माघारी घेतली जाणार नाही. जो कोणी पैसे परत घेतले जाईल असे बोलले त्याची जीभ हासाडून काढेल, असेही पवार म्हणाले.