ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

कानामागून आला अन् तिखट झाला! तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? दादांचा थेट CMला जाब, अन् वाद पेटला..

मुंबई : (Ajit Pawar Vs Ekanth Shinde) एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये एका दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचे वृत्त माध्यमांनी प्रकाशित केले आहे. त्यामुळे शिंदे-पवार या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यस्थी करून विषय थांबवल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी मंत्र्यांची एक खाजगी बैठक पार पडली. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्न, योजना व निर्णयावर या ठिकाणी चर्चा झाली. यावेळी ठाण्यातील कळवा येथील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला. त्यामुळे येत्या काळाद शिंदे-पवार गटातील वाद चिळणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र एकनाथ शिंदे यांनी देखील रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहितीही शिंदे यांनी अजितदादांना दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वाद वाढण्याची आणि बैठकीत शाब्दिक चकमक होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनीच मध्यस्थी केली, अन् वेगळा विषय काढून ठाण्याच्या विषयाला बगल दिली.

त्यामुळे शिंदे गटाची अवस्था म्हणजे ‘कानामागून आली अन् तिखट झाली’ अशी झाली आहे. अजित दादांनी विचारलेला जाब शिंदे गटातील मंत्र्यांच्या पचणी पडला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये असतानाही अजित पवार अडचण करायचे अन् आताही करत आहेत अशी खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे गट अन् पवार गट यांच्यातील वाद उफाळणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये