ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पवार कॅम्प में सन्नाटा क्यूँ?

पुणे | Maharashtra Politics – राज्याच्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असा चाललेला संघर्ष आणि तापलेलं वातावरण एकदम शांत कसं काय झालं, याचं कोडं अनेक राजकीय कार्यकर्त्यांना पडले आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथी झालेल्या आहेत. शिवसेना फुटली. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सपाटून मार बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा गेला, त्यापाठोपाठ पक्षात फूट पडली. विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या ८ सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस अगोदरच अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शरद पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर केल्याचे कळविले. एवढेच करून अजित पवार थांबले नाहीत. त्यांनी शरद पवार यांच्या दुटप्पी राजकारणावर टीकेची जाहीरपणे झोड उठवली.

शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांनी मैदानात उडी घेऊन अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवून अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली.

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कैवार घेतला आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाची देशाला गरज असल्याचे जाहीरपणे सांगितले. तर, जातीजातीत द्वेष पसरविणारे विषारी राजकारण भाजप करीत आहे, अशी टीका करून मोदी सरकारचा पराभव व्हावा यासाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पवार यांनी कंबर कसली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये