लोकसभा निवडणूकीबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; बारामतीसह ‘या’ जागा लढवणार
Ajit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठा गौप्यस्फोट केला आहे. बारामतीसह शिरूर, रायगड आणि सातारा या लोकसभेच्या जागा आपण लढवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना अजित पवारांनी ही माहिती दिली.
यावेळी अजित म्हणाले की, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. तसंच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा देखील आपण लढवणार आहोत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
लोकसभेची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तसंच आपल्याला जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे लागणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले.