काटेवाडीत अजित पवारांचेच वर्चस्व
पुणे : Ajit Pawar | बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला घवघवीत यश मिळाले आहे. काटेवाडीत 16 पैकी 14 जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपने प्रथमच काटेवाडीत शिरकाव केला असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने काटेवाडीत 2 जागा जिंकल्या आहे.
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार गट पुन्हा बाजी मारणार की, मतदार भाजपला संधी देणार, याकडे लक्ष लागले होते. अखेर बहुप्रतिक्षित काटेवाडी ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. काटेवाडीत यंदा भाजपचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. काटेवाडीत पहिल्यांदाच भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत.