पिंपरी चिंचवड

अजितदादांनी घेतली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. विधानसभेला एकत्रित सामोरे जायचे आहे, मतभेद, मनभेद ठेऊ नका, अशा सूचना पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शुक्रवारी पिंपरीत आली होती. निगडी ते पिंपरीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर एच.ए.मैदानावर सभा झाली. सभेनंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची कासारवाडीत एक बैठक झाली. खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, पार्थ पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, भाजपचे पदाधिकारी अजय पाताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल, नाना काटे, मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

लोकसभेच्या निकालाने नाउमेद होउ नका, विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा. सरकारने जनतेसाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, लोकांमध्ये मिसळा, त्यांच्या अडीअडचणी सोडवा. विधानसभेला एकत्रित सामोरे जायचे आहे, मतभेद, मनभेद ठेऊ नका, समन्वय राखा,विधानसभेसाठी कार्यकर्ते, लोकांच्या मनातील उमेदवार दिले जातील. सर्वांनी एकत्रित काम करावे, गटबाजी राहू नये यासाठी आगामी काळात महायुतीच्या विभागनिहाय एकत्रित जाहीर सभा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघे मार्गदर्शन करणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये