अक्षयचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला फर्स्ट लूक समोर, पाहा व्हिडीओ

मुंबई | Akshay Kumar – महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकरताना दिसणार आहे. तसंच त्याच्या शिवरायांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक समोर आला आहे.
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये चालत येताना दिसत आहे. तसंच अक्षयने हा व्हिडीओ शेअर करत ‘जय भवानी जय शिवाजी’ असं कॅप्शन दिलं आहे. अक्षयचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अक्षयचा हा लूक काहींच्या पसंतीस पडला आहे तर काहींच्या पसंतीस पडला नाहीये. तर अक्षयला ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी अक्षयचा खूप मोठा चाहता आहे पण मला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही, असं एका युजरने म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकरच उत्तम, अशीही प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिली.
One Comment