‘OMG 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “अक्षय कुमारने या चित्रपटासाठी…”
मुंबई | Akshay Kumar – बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘OMG 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसंच या चित्रपटासाठी अक्षय कुमारनं 35 कोटी रूपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. याबाबत आता ‘OMG 2’च्या निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘OMG 2’ चित्रपटाचे निर्माते अजित अंधारे यांनी पिकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, या चित्रपटासाठी अक्षयनं एकही रूपया घेतला नाही. त्यानं कसलंही मानधन न घेता या चित्रपटाच्या आर्थिक गोष्टींसाठी त्यानं स्वत: मदत केली आहे. तसंच अक्षयनं फक्त ‘ओएमजी 2’ या चित्रपटासाठीच नाही तर ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘स्पेशल 26’ या चित्रपटांनाही आर्थिक पाठिंबा दिला आहे.
पुढे अजित अंधारेंनी ‘ओएमजी 2’ चित्रपटाच्या बजेटबाबात सांगितलं. या चित्रपटाच्या बजेटबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या चित्रपटाचं बजेट 150 कोटी असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या पण हे सर्व खोटं आहे. खरं तर चित्रपटाच्या पहिल्या भागाची निर्मिती ही 25 कोटींमध्ये करण्यात आली आहे, असं अजित पंधारे यांनी सांगितलं.