Mission Raniganj: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ जाणार ऑस्करला; निर्मात्यांचा मोठा निर्णय
'मिशन रानीगंज' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Mission Raniganj | बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘मिशन रानीगंज’ (Mission Raniganj) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. अशातच आता रानीगंज चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
‘मिशन रानीगंज’ चित्रपटाबाबत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट स्वतंत्ररीत्या ऑस्करला (Oscar) पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आता फॉरेन फिल्म अॅवॉर्ड कॅटगिरीमध्ये नामांकित होणार नाहीये. तर आता या चित्रपटाला दुसऱ्या कॅटगिरीतून आपलं नॉमिनेशन सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे आता मिशन रानीगंज चित्रपट कोणत्या कॅटगिरीमध्ये आपलं नॉमिनेशन सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मिशन रानीगंज हा वास्तव घटनेवर आधारित चित्रपट आहे. 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील रानीगंजमध्ये कोळशाच्या खाणीत 65 मजूर अडकून पडले होते. त्यामुळे या मजुरांना बाहेर कसं काढायचं हा मोठा प्रश्न समोर होता. पण मायनिंग इंजिनिअर जसवंत गिल हे नेमकं काय करतात हे मिशन रानीगंज चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान, मिशन रानीगंज चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तेवढी कमाई केल्याचं दिसत नाहीये. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये या चित्रपटाच्या कमाईत किंचित वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं 20.8 कोटींची कमाई केली आहे.