ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

राणादा-पाठकबाईंना मुख्यमंत्र्यांनी दिल्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

मुंबई | Akshaya Hardeek Wedding – काही दिवसांपूर्वीच राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे लग्नबंधनात अडकले. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. यामध्ये आता अक्षया आणि हार्दिकला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्षया आणि हार्दिकनं लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, एकनाथ शिंदेंना काही कारणास्तव लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे त्यांनी दोघांना व्हिडीओ काॅलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांचा हा व्हिडीओ काॅलवर शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओ कॉलवर शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मला लग्नाला यायला जमलं नाही म्हणून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर हार्दिक म्हणाला,”ठाण्यात आलो की भेटायला येतो”. शुभेच्छांनंतर दोघांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, अक्षया-हार्दिकच्या विवाहसोहळ्यानंतर खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळच्या मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईंकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. तसंच राजकीय मंडळीदेखील त्यांच्या रिसेप्शनला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये