कपूर कुटुंबात लवकरच हालणार पाळणा?,आलियानं दिली गुड न्यूज!

मुंबई | Alia Bhatt Pregnancy – बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. तसंच आता त्यांनी एक नवीन गुड न्यूज (Good News) चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रणबीर आणि आलिया यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकताच आलियानं यासंदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आलिया भट्टनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर एकत्र दिसत आहेत. हा फोटो शेअर करून आलियानं “आमचं बाळ लकवरच येत आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. तसंच आलियानं शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. तसंच आलियानं तिच्या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.