आलिया भट्ट पुन्हा प्रेग्नंट? पोस्ट शेअर करत म्हणाली, “2.0…”
मुंबई | Alia Bhatt – बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. आलियानं लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये गरोदर (Pregnant) असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. तसंच दोन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. त्यामुळे तिनं काही महिने कामातून ब्रेक घेतला आहे. अशातच आलिया (Alia Bhatt) पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
नुकतीच आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरनं (Ranbir Kapoor) एका कॅलेंडर लॉन्चच्या इव्हेंटला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबीयांचेही फोटो लावण्यात आले होते. या दरम्यानचे त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी नेटकऱ्यांची नजर आलिया भट्टनं परिधान केलेल्या कपड्यांवर पडली. आलियानं ऑफ व्हाईट रंगाची पॅन्ट आणि त्यावर त्याच रंगाचा क्रॉप टॉप आणि ढगळं जॅकेट परिधान केलं होतं. तिने पुन्हा एकदा असे कपडे घातल्यानं ती पुन्हा गरोदर असल्याचं नेटकरी म्हणू लागले आहेत.
आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिनं हातामध्ये दोन फुलं घेतलेली आहेत. हा फोटो पोस्ट करताना तिनं लिहिलं आहे की, “2.O…वाट बघत राहा.” आलियानं दिलेल्या या कॅप्शनमुळे ती पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पण अद्याप आलियानं याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.