मुंबई | Alia Bhatt’s Statement In Discussion – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांंगलीच चर्चेत आहे. आलियानं काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रेग्नंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तसंच तिला काही नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील करण्यात आलं. यावरून आता आलियानं ट्रोल करणाऱ्यांना परखड शब्दांत उत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीमध्ये आलियानं तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलं आहे. दरवेळी आपण लोकांच्या गुड बुकमध्ये असतोच असं नाही. त्यामुळे आपण त्यांचा फारसा विचार न केलेला चांगला. लोकं तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला बोलणारच. मला आणि रणबीरला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केलं जातं. मला माझे कपडे, माझ्या घरचे, माझे चित्रपट यावरुन ट्रोल केलं गेलं आहे. याचा परिणाम माझ्यावर होतो हे त्या नेटकऱ्यांनी माहितीही नसते. अशावेळी मी त्यांना काय सांगू हा माझ्यासमोरचा मुख्य प्रश्न आहे, असं आलिया म्हणाली.
पुढे आलियानं म्हटलं आहे की, मी काही पार्सल वगैरे नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या प्रेग्नंसीवरुन माझ्यावर टीका करता तेव्हा त्याचा बारकाईनं विचार करावा. माझी प्रेग्नंसी आहे. त्यामुळे ती कशाप्रकारे करायची हे तर मी ठरवू शकते ना, तसा मला अधिकार तर आहे ना, त्यामुळे नेटकऱ्यांनी चांगल्याप्रकारे विचार करण्याची गरज आहे. आता तर पुरुष देखील प्रेग्नंट राहतात. त्यामुळे दरवेळी बायकांवर टीका करण्याची काही गरज नाही. अशा शब्दांत आलियानं सुनावलं आहे. दरम्यान, येत्या महिन्यात आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.