राष्ट्रसंचार कनेक्ट

अलमट्टी उंची वाद शिगेला

कोल्हापूर-सांगलीत बंदचा सर्वपक्षीय समितीचा इशारा

कोल्हापूर : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटकने खटला भरल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ही लढाई सुरू झाली आहे. धरणाची उंची वाढविण्यास विशेषत: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतून तीव्र विरोध होत आहे. धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतल्यास कोल्हापूर आणि सांगली बंद ठेवण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.

सांगली महापालिकेच्या १९ ऑक्टोबरच्या सभेत अलमट्टीची उंची वाढविण्यास विरोध करण्याचा ठराव करण्याची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगलीला पूरसदृश परिस्थिती जाणवेल. त्यामुळे सर्वपक्षीय कृती समिती आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करणार आहे. तसेच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगलीचे पालकमंत्री सुुरेश खाडे यांना भेटून केंद्र व सर्वोच्च न्यायालयात विरोधकांची भूमिका मांडण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन कृष्णा नदीकाठावरील गावांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. गावे, शेती पर्यायाने सारे जीवनच उद्धस्त होण्याची भीती आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय सध्या गत्यंतर नाही. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गावे कायमची संकटात सापडणार आहेत. २००५, २०१९, २०२१ या सालात अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळी आलेल्या महाप्रलंयकारी महापुराचे नुकसान पाहता संपूर्ण शिरोळ तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले होते.

पुरानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वडनेरे समितीही नेमण्यात आली होती. त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या, लोकांशी चर्चा केली. कुरुंदवाड येथे त्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात म्हटले आहे की, हिप्परगी धरणाजवळील तांत्रिक समस्या आणि कर्नाटक सीमेवरील अंकले-मांजरी पूल भरणे हे पूर लवकर न ओसरण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे तालुक्यातील नेत्यांनी राजकारण न करता एकजुटीने उभे राहून धरणाची उंची वाढविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये