Raj Thackeray: टोलनाक्यावर सरकारसोबत मनसेचेही कॅमेरे असतील…; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या
मुंबई | Raj Thackeray – सध्या टोल माफी प्रकरणावरून मनसे (MNS) चांगलीच आक्रमक झाली आहे. तसंच टोलसंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुरूवारी (12 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. तर आज राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीदरम्यान ठाकरेंनी राज्य सरकारकडे काही मोठ्या आणि महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
राज ठाकरेंनी राज्य सरकारकडे नेमक्या काय मागण्या केल्या?
– येत्या 15 दिवसांमध्ये सरकार मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. मंत्रालयात याचा कंट्रोलरूम असणार आहे. सरकारसोबत आमचे देखील सीसीटीव्ही कॅमेरे एन्ट्री पॉइंटवर असणार आहेत. तर टोलनाक्यावरून दररोज किती गाड्यांची ये जा होते हे पाहिलं जाणार आहे.
– वाहन पिवळ्या रेषेमागे 4 मिनिटांपेक्षा जास्तवेळ थांबल्यास टोल आकारला जाऊ नये.
– प्रत्येक टोलनाक्यावर स्वच्छ प्रसाधनगृहे असावीत. तसंच महिलांसाठी प्रसाधनगृहांची सोय असावी.
– टोलनाक्याच्या परिसरातील नागरिकांना सवलतीच्या दरात पास देण्यात यावे.
– रस्ते खराब असतील तर टोल भरला जाणार नाही.
– ठाणेकरांनी एरोली किंवा आनंदनगर टोलनाक्यावर एकदाच टोल भरावा
– टोलनाक्यावर प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, प्रकाश यंत्रणा, रूग्णवाहिका, पोलीस अंमलदार असावे.
– जर टोलनाक्यावर तैनात असणारे कर्मचारी उर्मट असतील तर त्यांच्या ऐवजी सरकारी यंत्रणेचे कर्मचारी असावेत.
– 5 रूपये वाढीव टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला एक महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
– जर टोलनाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर एकदाच टोल भरायचा, परत टोल भरायचा नाही. जर दोनदा टोल कपात झाल्यास त्याबाबत तक्रार करता यावी.
– टोलनाक्यावर तैनात असणारे कर्मचारी उर्मट असतील तर त्यांच्या ऐवजी सरकारी यंत्रणेचे कर्मचारी तेथे असावेत