क्राईमपुणे

हडपसरमध्ये रुग्णवाहिका जाळून खाक

हडपसर, मगरपट्टा, नोबल हॉस्पिटल पार्किंग येथे एका रुग्णवाहिकेने पेट घेतला. ही घटना रविवारी (दि.२८) दुपारी घडली.
आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर (hadapsar )अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. संजीवनी अँब्युलन्स सर्व्हिस या रुग्णवाहिकेने पेट घेतला आहे. त्याचवेळी जवानांनी आतमध्ये कोणी अडकले नसल्याची खात्री करत पाण्याचा मारा करत सुमारे पंधरा मिनिटात आग पुर्ण विझवण्यात आली.

पुढील धोका दुर केला. आगीमध्ये कोणीही जखमी नसून रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत हडपसर अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक चंद्रकांत जगताप व जवान सोमनाथ मोटे, मंगेश शिंदे, रामदास लाड, उमेश शिरसाट यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये