ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

“भारतात पाकिस्तानी कलाकार दिसला तर…”, अमेय खोपकरांचा गंभीर इशारा

मुंबई | Ameya Khopkar – आत्तापर्यंत अनेक पाकिस्तानी कलाकारांनी (Pakistani Artist) बाॅलिवूडमध्ये (Bollywood) लोकप्रियता मिळवली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध गायक अतिफ अस्लम, फवाद खान, अदनाना सामी अशा अनेक कलाकारांनी बाॅलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. तसंच भारतात त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यादरम्यान, भारतात यापुढे पाकिस्तानी कलाकार दिसता कामा नये असा गंभीर इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khokar) यांनी दिला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “बॅालिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.”

https://www.facebook.com/ameya.khopkar/posts/10162317116780550

दरम्यान, अमेय खोपकर यांनी केलेल्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. काहींनी त्यांच्या भूमिकेचं कौतूक केलं आहे तर काहींनी त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये