ताज्या बातम्यामनोरंजन

Amitabh Bachchan Birthday: बिग बींचं चाहत्यांसोबत अनोखं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ होतोय व्हायरल

Amitabh Bachchan Birthday Celebration | आज (11 ऑक्टोबर) बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा वाढदिवस (Birthday) आहे. आज ते त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

यंदा अमिताभ बच्चन यांनी त्यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसोबत साजरा केला आहे. अमिताभ बच्चन यांनी रात्री 12 वाजता घराबाहेर येत चाहत्यांसोबत अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला. सध्या या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसादवशी त्यांचे चाहते त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. तर यंदाही चाहते अमिताभ बच्चन यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर थांबले होते. रात्री 12 वाजता चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी बिग बींच्या जलसाच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन देखील घराबाहेर आले आणि त्यांनी चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. यावेळी अमिताभ बच्चन एकदम स्टायलिश अशा लूकमध्ये दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये