ताज्या बातम्यारणधुमाळी

“समोरचा उमेदवार हा डमी…” आढळरावांच्या टीकेला कोल्हेंचं जोरदार प्रत्युत्तर

मंचर | शिरूर लोकसभा मतदारसंघाचा (Loksabha Elecetion 2024) प्रचार पुढे सरकत असताना प्रचारामध्ये आरोप- प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेत बोलत असताना असताना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांचा समाचार घेतला आहे.

या पदयात्रेदरम्यान, विरोधकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत आपला पोरकट बालिशपणा दाखवून दिला. या बालिशपणाचा डॉ. कोल्हे यांनी खरमरती समाचार घेतला. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, ज्या मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करण्यात आला. त्यावरुन हे गद्दार आहेत हे माहिती होत हे इतके भेकड आहेत हे माहित नव्हतं. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या, असं थेट जाहीर आव्हान विरोधकांना दिल.

कोरोना महामारीच्या काळात खासदार कुठं होते असं विचारणाऱ्या विरोधकांच खरचं हसू येत, असं सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकच नव्हे तर फॅबी फ्ल्यु या १०५ रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणाराही खासदार अमोल कोल्हेच होता.

घोषणा जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने दिल्या जात असतील, तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं, त्या पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली होती, तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत, जेव्हा दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडले तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत? बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फ्रेज लाईट का दिली जात नाही हे विचारताना तुमचं तोंड का शिवल होत? तसेच माध्यमांमध्ये बातमी वाचली, समोरचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे. मला फार खंत वाटली असं सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये