“सरकारचं काऊंटडाऊन सुरू, शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात…”, अमोल मिटकरींचं ‘ते’ ट्विट चर्चेत
मुंबई | Amol Mitkari – काल (20 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) वादाबाबत सुनावणी पार पडली. ‘शिवसेना’ (Shivsena) पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा सांगितला. निवडणूक आयोगानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 30 तारखेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खळबळजन ट्विट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
“सरकारचं काऊंटडाऊन सुरू. शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की”, असं खळबळजनक ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
दरम्यान, जर न्यायालयात शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले, तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, अशी शक्यता विरोधी पक्षांकडून वर्तवली जात आहे. तसंच विरोधी पक्षाकडून सरकार कोसळणार असल्याचे दावेही केले जात आहेत. तर आता निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीमध्ये पुढे नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.