ताज्या बातम्यारणधुमाळी

देवेंद्र फडणवीसांना मिसेस फडणवीसांच्या हटके शुभेच्छा; “जिलेबी कितीही…”

मुंबई | Amruta Fadnavis Wishes Devendra Fadnavis On His Birthday – आज (शुक्रवार) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी जिलेबीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं आहे. 

अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं असून सध्या ते चांगलंच चर्चेत आहे. अमृता यांनी फडणवीसांना जिलेबी भरवत असलेला फोटो ट्विट केला केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या खास शैलित शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांचं हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये