ताज्या बातम्यामनोरंजन

अमृता फडणवीसांचं ‘हे’ नवीन गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीस!

मुंबई | Amruta Fadnavis New Song- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. तसंच त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. त्याचबरोबर त्या नेहमी चाहत्यांसाठी नवनवीन गाणी घेऊन येत असतात. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा असून ते नेहमी त्यांच्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. आता अमृता फडणवीस चाहत्यांसाठी एक नवीन गाणं घेऊन आल्या आहेत.

अमृता फडणवीस त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणं घेऊन आल्या आहेत. यासंदर्भातलं एक ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ हे नवीन गाणं त्या घेऊन आल्या आहेत. त्यांनी या गाण्याचं पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की, “लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना…लफ्ज नए है, पर रंग वही सुहाना…!”

दरम्यान, ‘वो तेरे प्यार का गम’ हे गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. तर या गाण्याचं दिग्दर्शन शक्ती हसीजा यांनी केलं आहे. तसंच अमृता फडणवीस यांनी या गाण्याचं पोस्टर प्रदर्शित करताच चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये