ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे”

मुंबई | Amruta Fadnavis – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे”, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्या सोमवारी (14 नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे उपस्थित होते.

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. पण, आम्हाला स्वत:चं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यात कमतरता नाही पण आम्ही असं करत नाही. आमचं तसंच दिसून येतं.”

“आमची ती महानता तशीच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कधीच हे पद मागितलं नाही. देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं”, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये