ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

तुरूंगात असलेल्या सिद्धू यांच्यासाठी कर्करोगाशी झुंजणाऱ्या पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “…ही देवाची इच्छा”

मुंबई | Navjot Singh Siddhu – सध्या काँग्रेस नेते, माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) तुरूंगात आहेत. ते रोज रेड डेथ प्रकरणी तुरूंगात शिंक्षा भोगत आहेत. अशातच सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर (Navjot Kaur) यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. नवजोत यांना स्टेज 2 कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांनी सिद्धू यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

पती नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासाठी नवजोत कौर यांनी एक ट्विट केलं आहे. “त्यांनी जो गुन्हा कधी केलाच नाही, त्याची शिक्षा ते आता भोगत आहेत. मात्र, या गुन्ह्यातील दोषींना माफ करण्यात आलंय. रोज मी तुमची वाट पाहत असते. तुमचं दु:ख इतरांसोबत शेअर करत असते. वाईट परिस्थितीत देखील सुधारणा होईल, अशी मला आशा आहे”, असं नवजोत यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “सत्य खूप शक्तिशाली असून ते तुमच्या वेळेची परिक्षा घेतं. कलियुग. मला स्टेज 2च्या कॅन्सरचं निदान झाल्यामुळे तुमची वाट पाहू शकत नाही. माझी आज सर्जरी आहे. मला यासाठी कोणालाही दोष द्यायचा नाही. कारण ही देवाची इच्छा आहे. परफेक्ट”, असं भावानिक ट्विट नवजोत कौर यांनी केलं आहे.

दरम्यान, 1988 मधील रोड रेज डेथ प्रकरणात नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे सिद्धू आता पटियाला मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ते मे 2022पासून तुरुंगात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये