शिवसेनेला पुन्हा झटका, माजी आमदाराने नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा!

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी पक्ष आपल्यासोबत उभा राहिला नसल्याचं म्हटलं आहे.
सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस देखील केली नाही. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना अडसूळ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून यायचे. परंतु अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र आता अडसूळ शिंदेंच्या गटात जातात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.