अनन्याचा वडील चंकी पांडेंसोबत ‘सात समुंदर पार’ गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

मुंबई | अभिनेत्री अनन्या पांडे हिची चुलत बहीण अलाना पांडे गुरूवारी मुंबईत बॉयफ्रेंड इव्होर मॅक्रेसोबत लग्नगाठीत अडकली. तिचे हळदी, मेंदी आणि ब्राइडल शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, लग्नातील अनन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अनन्या तिचा भाऊ अहान पांडे आणि वडील चंकी पांडेसोबत डान्स करताना दिसत आहे. बाप लेकीचा हा व्हीडोओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
एका ऑफिशियल पेज ने त्यांच्या अकाऊंटवरून अनन्या पांडेचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दिव्या भारतीचे आयकॉनिक सॉंग ‘सात समुंदर पार’ या गाण्यावर अनन्या भाऊ अहानसोबत नाचताना दिसतेय. बहीण भावाचा हा व्हिडिओ चाहत्यांना फारच आवडलाय. यामध्ये अनन्या ठुमके लावत आहे. तर अहानही बहिणीच्या तालावर नाचत होता. यानंतर मध्येच चंकी पांडेची एंट्री होते. बापलेक एकदम ठसक्यात गाण्यावर ताल धरतात. मुलीसोबत ठुमके लावताना चंकी पांडे चा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. या बापलेकीच्या जोडीवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.