अन् ‘वनी’ला लागली झोप, हास्यजत्रेमधील या कलाकाराचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

मुंबई : सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा असून त्यामधील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांणवर भुरळ घातली आहे. त्यातील सर्वांची लाडकी अभिनेत्री वनिता खरात ही एक आहे. तिने आपल्या बाह्य सौदर्यापेक्षा अभिनयातून स्वतःला सिद्ध केलं आहे. विनोदाचा अचूक टायमिंग आणि तेवढीच दर्जेदार कॉमेडीने वनिता प्रेक्षकांना खळखळून हसवते. तसेच ती आपल्या सहकलाकारांसोबत मज्जा-मस्ती करताना देखील पाहायला मिळत असते. नुकताच तिचा सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वनिता खरात आणि कॉमेडीचा बादशहा प्रसाद खांडेकर या जोडीने आतापर्यंत अनेक सुपरहिट विनोद केले आहेत. १९ जुलैला वनिताचा वाढदिवस होता यानिमित्त तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर प्रसाद खांडेकर याने तिचा एक सेटवरील झोपतानाचा व्हिडीओ शेयर करत शुभेच्या दिल्या आहेत. पोस्ट मध्ये प्रसाद म्हणाला की, “ हा जादूचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सुरु केला की तुम्ही ‘वने’ अशी जोरात हाक मारा. मग जादू होईल. वनी तुमच्याकडे बघेल मग तिला बर्थडे विश करा. आज आमच्या वनीचा( बबड्याचा) वाढदिवस आहे. आमच्या सेट वरील सगळ्यांची लाडकी आणि सर्वांकडून स्वतःचे हक्काने हट्ट करून लाड करून घेणारी ही वनी. वने तुला आयुष्यात जे जे हवं ते ते सगळं तुला मिळो.”असं प्रसाद खांडेकर याने म्हटलं आहे.
दरम्यान, कॉमेडी किंग समीर चौगुले याने देखील वनिताला शुभेच्या देत काही फोटो शेअर केले आहे. तिच्या विनोदाबरोबरच सेटवरील हा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडला असून तिच्या या व्हिडिओला भरभरून प्रेम मिळत आहे. वनिताने छोट्या पडद्यापासून आपल्याला अभिनयाला सुरुवात केली होती. हिंदी सिनेमा कबीर सिंग मध्ये देखील तिने अभिनय केला आहे.