ताज्या बातम्यादेश - विदेश

सीमा हैदर प्रकरणाची पुनरावृत्ती; राजस्थानची अंजू प्रियकराला भेटण्यासाठी गेली थेट पाकिस्तानात

Rajasthan Women Anju – सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदरची (Seema Haider) चर्चा सगळीकडे सुरू आहे. सीमा हैदर ही तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना (Sachin Meena) याच्यासाठी पाकिस्तानातून भारतात आली आहे. ती भारतात आल्यापासून तिच्याबाबत अनेक संशयही व्यक्त केले जात आहेत. अशातच आता भारतातील एक महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानात गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे.

राजस्थानची अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (Anju) ही महिला तिच्या सोशल मीडियावरील प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेली आहे. अंजू ही तिचा पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. याबाबत अंजूचा पती अरविंदनं सांगितलं की, “अंजू ही जयपूरला सहलीसाठी जाते सांगून गेली होती. त्यानंतर ती कुठे गेली याबाबत काहीही माहिती नाही. पण काही दिवसांमध्ये ती परत घरी येईल. ती व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे माझ्या संपर्कात असते. रविवारीही तिनं मला कॉल केला होता.”

दरम्यान, अंजू ही फेसबुकवरून पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरूणाशी बोलत होती. त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू ही लाहोरमध्ये खैबर पख्तून परिसरात नसरूल्लाह नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचं एक पत्र मिळालं आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये