ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“देव जरी खाली आला तरी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही”, जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil | आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची परभणीच्या सेलू इथं जाहीर सभा पार पडली. त्यावेळी मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय जाहीर करण्यासाठी सरकारकडे दोन दिवस राहिले आहेत, त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात निर्णय जाहीर करा, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, राज्य सरकारला याआधी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. समिती गठीत झाली तेव्हा काही झालं नाही. त्यानंतर पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी 30 दिवसांचा वेळ मागितला. आम्ही त्यांना 40 दिवसांचा वेळ दिला. तसंच ते पुन्हा आले पुन्हा बोलले, मागणीप्रमाणे आरक्षण हवं तर आधार लागतो. मग पुन्हा समिती नेमली, समितीला नोंदी सापडल्या. तर आता तुम्हाला कायदा परित करायला अडचण काय आहे, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

देव जरी खाली आला तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जर सरकारनं एकाला अटक केली तर सर्वांनी तुरूंगात जायचं त्यामुळे सरकारनं हे गांभीर्यानं घेण्याच गरज आहे, नाहीतर त्यांना जड जाईल, असा इशाराही जरांगेंनी दिला.

पुढे ते मराठा समाजाला आवाहन करताना म्हणाले की, तुमची एकजूट अशीच राहू द्या, ती फुटू देऊ नका. कारण इथे ना तुमचा फायदा आहे ना माझा. हा फायदा घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा आहे. तुमची लेकरं मोठी होणार, त्यांना न्याय मिळणार आहे त्यामुळे मागे हटू नका. आंदोलन शांततेत करा आणि मराठ्यांनो ताकदीनं एकत्र या, असं आवाहन जरांगेंनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये