ताज्या बातम्यादेश - विदेश

महत्त्वाची बातमी! नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

Women’s Reservation Bill | आज (19 सप्टेंबर) गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) मुहुर्तावर नवीन संसद भवनात (New Parliament Building) लोकसभेचं कामकाज सुरू झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या संसद भवनातून मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींकडून महिला आरक्षणासाठी विधेयक (Women’s Reservation Bill) मंजूर करण्यात आले आहे. तर आज हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे.

या विधेयकाबाबत पंतप्रधान मोदींनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पंतप्रधानांनी महिला आरक्षणासाठी घटनेत दुरूस्ती करणार असल्याचं सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांसाठी इतिहास घडवण्याची हीच खरी वेळ आहे. मंत्रिमंडळानं महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आज आपलं सरकार संविधान दुरूस्ती विधेयक मांडणार आहे.

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण मिळेल. तसंचअनेकदा महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले, पण देवाने अनेक पवित्र कामांसाठी माझी निवड केली आहे. तर भारताला चांद्रयान-3 च्या यशाचा अभिमान आहे. आम्ही नव्या संकल्पानं संसद भवनात आलो आहोत. त्यामुळे कटुता विसरून पुढे जायचे आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये