क्रीडाताज्या बातम्या

बृजभूषण सिंह यांच्यावर अंशू मलिकचे गंभीर आरोप; म्हणाली, जेव्हा ते शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक मुलीशी…”

नवी दिल्ली | Brijbhushan Singh – काही दिवसांपूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू (Wrestler) साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे (Sexually Harassed) आरोप केले होते. तसंच आता राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकनं (Anshu Malik) देखील बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. मलाच नाही तर प्रत्येक मुलीला चुकीचं वाटेल असं वर्तंन बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) करतात, असं अंशू मलिकनं सांगितलं.

बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) हे स्पर्धा असताना शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक महिला पहिलवानाशी ते असभ्य वर्तन करतात. तसंच ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिप असताना बृजभूषण सिंह हे मुलींसोबत एकाच मजल्यावर राहिले होते. त्यावेळी ते आपल्या रूमचा दरवाजा उघडा ठेवून मुलींना संकोच वाटेल असं वर्तन करत असत. त्यामुळे त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही करत आहोत, असं अंशूनं म्हटलं आहे.

पुढे विनेश फोगाटनं देखील या प्रकरणावर हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, जेव्हापासून मी या प्रकरणात आवाज उठवला आहे तेव्हापासून ज्या मुलींना त्रास झाला आहे त्या मुली समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही बृजभूषण यांच्याविरोधात पुरावे द्यायला तयार आहोत. बृजभूषण यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर तसं झालं नाही तर भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांनी तुरूंगात जायची तयारी ठेवावी. आता आमच्यासोबत दोन महिला मल्ल आहेत ज्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. तसंच आमचं म्हणणं जर ऐकून घेतलं गेलं नाही तर कुस्ती महासंघाचे सदस्य तुरूंगात कसे जातील याची व्यवस्था आम्ही करू, अशा इशारा विनेश फोगाटनं दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये