“आज तो रन बना लै…”, भर कार्यक्रमात अनुष्कानं विराटची उडवली खिल्ली; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | Anushka Sharma-Virat Kohli – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. तसंच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमी चर्चेत असतात. ते सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. त्या दोघांचा चाहता वर्गही लाखांहून अधिक आहे. तसंत आता विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत अनुष्का विराटची खिल्ली उडवताना दिसत आहे.
अनुष्का आणि विराटनं नुकतीच ‘प्युमा’ या स्पोर्ट्स ब्रॅण्डच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान विराट आणि अनुष्काला मुलाखतकारानं भन्नाट प्रश्न विचारले आहेत. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या कार्यक्रमात अनुष्का आणि विराटला विविध मजेशीर टास्क देण्यात आले होते. यावेळी अनुष्काला विराट कोहलीला स्लेज करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे विराटला स्लेज करण्यासाठी अनुष्का विकेटकीपर झाली आणि कोहली फलंदाजी करत होता. यावेळी “चल विराट आज 24 एप्रिल है. आज तो रन बना लै… असं म्हणत अनुष्कानं विराटची खिल्ली उडवली. तर यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, तुझ्या टीमनं एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये मिळून जेवढ्या धावा केल्या नसतील तेवढ्या माझ्या मॅच आहेत. नवऱ्यान दिलेलं हे उत्तर ऐकून अनुष्का म्हणते, हो मग आतापासून मी तुझ्या टीममध्ये. सध्या अनुष्का आणि विराटच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.