‘मी तुझ्यावर कायम प्रेम करेन…’,अनुष्कानं ‘पतीदेव’ विराट कोहलीला दिल्या वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा
Anushka Sharma Wish Husband Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या 35व्या वाढदिवशी विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 2008 मध्ये भारतासाठी खेळून कारकिर्दीची सुरुवात करणारा कोहली आज तमाम चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.
विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी आणि त्याच्या चाहत्यांनी विराटवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र विराटला त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने नेहमी प्रमाणे एका खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे. अनुष्का आणि विराटची बाँडिंग सर्वांनाच माहित आहे. अनुष्का विराटची मस्करी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता अनुष्काने विराटचे काही फोटो शेयर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्काने विराट कोहलीचे काही फोटो पोस्ट करत लिहिले की, “तो आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट आहे! तसेच, तो त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत नवनवीन यशाची शिखरं गाठत आहे. मी तुझ्यावर नेहमी, या जीवनात आणि प्रत्येक क्षणी, काहीही झाले तरी असेच प्रेम करेल.”