ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी शुक्लांची नियुक्ती तळ्यात-मळ्यात? अधिकृत घोषणा नाहीच

मुंबई | Rashmi Shukla – राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) पदी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची नियुक्ती झाल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. नियुक्ती बाबत माहिती नुकतीच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर पोस्टही केली. मात्र मुनगंटीवार यांनी काही वेळातच ट्विट डिलीट केले आहे. मुनगंटीवार यांच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. मात्र, याबाबत गृहमंत्रालयाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. राज्य गृहमंत्रालयाकडून या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाबरोबर रजनीश सेट यांच्या अभिनंदनाचे देखील ट्विट केले होते. मात्र ते डिलीट करण्यात आलेले नाही. मुनगंटीवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!’

मागील काही दिवसांपासून शुक्ला यांचे नाव चर्चेत आहे. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये