राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्लांची नियुक्ती
मुंबई | Rashmi Shukla – राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. तर याबाबतची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत दिली आहे.
भाजप नेते आणि सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!”
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. दरम्यान, रश्मी शुक्ला या महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आल्या होत्या.