‘लवासा’च्या विक्रीस मंजुरी

पुणे | Pune News – पुणे (Pune) जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. नैसर्गिक हिल स्टेशन आहेत. लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हिल स्टेशन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. आता या हिल स्टेशनची विक्री करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पश्चिम घाटामध्ये बांधलेले लवासा (Lavasa) हे खासगी हिल स्टेशन विकले गेले आहे.
मुंबईतील डार्वीन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरने १,८१४ कोटी रुपयांना ते विकत घेतले आहे. NCLT ने २५ पानांचा आदेश पारित केला आणि १,८१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना मंजूर केली. DPIL अनेक सेवांशी निगडित आहे. ज्यात पायाभूत सुविधा, रिफायनरीज, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. लवासा विकत घेण्यासाठी यापूर्वी जेट एअरवेज आणि रिलायन्स कॅपिटलने बोली लावली होती. या रकमेमध्ये १४६६ कोटी रुपयांच्या निराकरण योजनेच्या रकमेचा समावेश आहे.
या रकमेतून कॉर्पोरेट कर्जदाराला हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम दिली जाईल. या रिझोल्यूशन योजनेच्या देखरेखीसाठी एक समिती नेमली जाणार आहे. या निर्णयामुळे सध्या अडचणीत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. लवासात घर खरेदी केलेल्या ८३७ जणांनी यासाठी दावा दाखल केला. या दाव्याची किंमत ४०९ कोटी रुपये इतकी आहे. कंपनीनं ज्या निधीला मान्यता दिली तो निधी ६६४२ कोटी रुपये इतका आहे.