पुण्यात गुन्हेगारीचं सत्र संपेना; कारचा धक्का लागल्यामुळे आधी झाला वाद अन् नंतर भर रस्त्यातच केली तरूणाची हत्या
पुणे | Pune Crime : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात (Pune) गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. आताही पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कारचा धक्का लागल्याच्या क्षृल्लक कारणावरून एका तरूणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. अभिषेक संजय भोसले असं मृत तरूणाचं नाव आहे. या घटनेनंतर हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कारचा धक्का लागल्यामुळे दोन तरूणांमध्ये वाद झाला. त्या दोघांमधील वाद इतका वाढला की त्यातील एकानं थेट टोकाचं पाऊल उचलंल. तरूणानं दुसऱ्या तरूणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली.
ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री फुरसुंगी ते चंदवाडी रोड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी विलास सुरेश सकट, सचिन सकट, कैलास सुरेश सकट यांच्यासह आणखी 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.