ताज्या बातम्यादेश - विदेश

मोठी बातमी! सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीला अपघात, 16 भारतीय जवान शहीद

सिक्कीम | Sikkim Accident – सिक्कीममधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या (Indian Army) गाडीला मोठा अपघात (Accident) झाला आहे. लष्कराचे वाहन दरीत कोसळल्यानं 16 जवान शहीद झाले आहेत. तर, चार जवान जखमी झाले आहे. हे लष्कराचे वाहन चट्टेनहून थंगूच्या दिशेनं जात होते. तेव्हा ही घटना घडली आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील झेमा येथे ही घटना घडली. लष्कराच्या तीन वाहनांचा ताफा सकाळी चट्टेनहून थंगूचे दिशेने निघाला होता. तेव्हा झेमा येथे उतारावरून जाताना एका तीव्र वळणावर लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळला. या घटनेत 16 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, चार जवान जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून, अपघातातील चार जखमी जवानांना उपचारांसाठी विमानानं हलवण्यात आलं आहे. या रस्ते अपघातात तीन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि 13 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये