मुंबई – भारत आणि इग्लंडमधील टी-20 मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेमधील पहिला टी-20 सामना आज होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये युवा गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. अर्शदीप सिंग असं खेळाडूचं नाव असून गोलंदाज आहे.
आयपीएलच्या मागच्या दोन मोसमांमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आहे. रोहित शर्मानेही पुनरागमन केलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तो कसोटी खेळू शकला नव्हता.
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन बाद झाले असून सुर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा फलंदाजी करत आहे. इंग्लंडकडून मोईन अलीने दोन बळी घेतले. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना पहिल्या टी-20 साठी विश्रांती देण्यात आली आहे.