“मिट्टी के लिये लडे थे…”; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची ‘ती’ शेवटची फेसबुक पोस्ट चर्चेत
मुंबई | Nitin Desai Suicide – सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येनं मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी हादरली आहे. तसंच त्यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सध्या नितीन देसाई यांची शेवटची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
नितीन देसाई यांनी हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर पोस्ट केला होता. हा टिझर पोस्ट करत त्यांनी म्हटलं होत की, मिट्टी से जुडे है.. मिट्टी के लिये लडे थे… देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी. नितीन देसाई यांनी ही पोस्ट 26 जानेवारी रोजी पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीये. त्यामुळे ही पोस्ट त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली आहे.
दरम्यान, नितीन देसाई यांचं सिनेसृष्टीत खुप मोठं नाव होतं. सिनेसृष्टीसोबतच त्यांचे पंतप्रधान मोदींपासून ते महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यांंनी अनेक सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचे सेट उभारले आहेत. तसंच ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटानं त्यांना खऱ्या अर्थानं ब्रेक मिळाला होता. तसंच देसाई हे दिग्दर्शक तर होतेच सोबतच ते अभिनेते देखील होते.