रात्रीस खेळ चाले! शिंदे-फडणवीसांच्या रात्रींच्या बैठकीवर शिवसेनेची खोचक टिका!

मुंबई : (Arvind Sawant On Shinde-Fadnavis Government) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणातील टीकेची पातळी अगदी खालच्या स्तराला गेली आहे. त्यातच आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू असताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती आहेत”. अशा तिखट शब्दात सावंत यांनी उपमुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान सावंत म्हणाले, “उपमुख्यमंत्र्यांना रात्रीचे कटकारस्थान करण्याची सवय झाली आहे. आतापर्यंत जे कटकारस्थान रचली ती रात्रीच्या अंधारात रचली आणि वेशांतर करुनच केली असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होता, असं स्पष्ट केलं होतं”, याची आठवणही सावंत यांनी यावी फडणवीसांना करुन दिली आहे.
सावंत मुख्यमंत्र्यांवर टिका करताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पायाखलची वाळू सरकतेय, माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, ते शिंदेंना झोंबलं आहे, म्हणून ही प्रतिक्रिया आली आहे. या प्रतिक्रियेतून हात चालवला असल्याचा आरोपही अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर केला आहे.