ताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ashadhi Wari : संत मुक्ताईच्या पालखीचं ३ जूनला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

पंढरपूर | Ashadhi Wari | कोरोना (Corona) संकटामुळे दोन वर्षे आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळ्यात खंड पडला होता. मात्र यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा वारकऱ्यांना पालखी (Palkhi) सोहळ्यासोबत पंढरीची वाट चालायचे वेध लागले आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या (Sant Muktai) पालखीचे ३ जूनला प्रस्थान होणार आहे. जळगाव येथील कोथळी (Kothali) गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजे समाधी स्थळापसून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला (Pandharpur) रवाना होणार आहे. आळंदी (Aalandi) येथून संत ज्ञानेश्वरांच्या (Sant Dnyaneshwar) पालखीचे प्रस्थान २१ जूनला तर संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखीचे प्रस्थान २० जूनला होणार आहे. (Ashadhi Wari)

आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार शेकडो दिंड्या, पालख्या आणि लाखो वारकरी पायी प्रवास करून मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे रवाना होत असतात. तसंच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या समाधीस्थळापासून संत मुक्ताईची पालखी ही पंढरपूरकडे जाण्याची परंपरा आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे (Vitthal) दर्शन घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

३ जून पासून ३४ दिवसांचा प्रवास प्रवास करून तापी तिरावरून भीमा तीरावर ही पालखी जाणार आहे. 34 गावांच्या प्रवासात प्रत्येक मुक्कामा ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन आणि प्रसाद आयोजित केला जातो. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.आषाढी एकादशी निमित्ताने सर्व संतांच्या पालख्या या वाखारी येथे एकत्र येत असतात. या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या सर्व पालख्यांचे स्वागत केले जात असते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये