ताज्या बातम्यारणधुमाळी

“…तर राऊतांनी घरी जाऊन गजनी सिनेमा बघावा”, आशिष शेलारांचा टोला

मुंबई | Ashish Shelar On Sanjay Raut – सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तावर चर्चा करत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यघटनेचा हवाला देत हे राज्य सरकारच बेकायदेशीर असल्याचं सांगत दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी १२ मंत्र्यांची गरज लागते, असं ट्वीट केलं होतं. राऊत यांच्या या दाव्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांच्या काळात किती मंत्री होते हे त्यांना आठवत नसेल, तर त्यांनी घरी जाऊन गजनी सिनेमा बघावा”, असा सल्ला शेलारांनी राऊतांना दिला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1ए नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे.

दरम्यान, यावरुन आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांनी घरी गेल्यावर गजनी सिनेमा नक्की बघावा. ज्यांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी हा सिनेमा बघावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे. ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे राज्य होते त्यावेळी ३२ दिवस किती मंत्री होते याचं उत्तर त्यांनी द्यावं, याचा अर्थ त्यांचे सरकारही अनाधिकृत होतं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये