ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आंबेडकरांच्या जन्माचा वाद पेटला! संजय राऊतांवर आशिष शेलार संतापले; म्हणाले “आता यांची मस्ती थेट…”

मुंबई : (Ashish Shelar On Sanjay Raut) महाविकास आघाडीने शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आता भाजपनेही कंबर कसली आहे. भाजपकडूनही उद्या मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, शेलारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांनाही लक्ष्य केलं. राऊत यांना भाई गिरकर यांनी आंबेडकरांसंबंधी दोन पुस्तकं पाठवली असल्याची माहिती देत त्यांनी दिली. “बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकांचा त्यांनी याचा अभ्यास करावा,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहेत. एखादे संकट आल्यावर शेतकऱ्याला ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं आहे,” अशी टीका यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये