“याकूब मेमनच्या थडग्याला फुलं घातली, त्यांनी आम्हाला…” भाजपचा ठाकरेंवर जोरदार प्रतिहल्ला
मुंबई : (Ashish Shelar On Uddhav Thackeray) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजवादी पक्ष आणि इतर २२ संघटनांसोबत युती केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यात मतभेद होते परंतु ते आम्ही बाजूला सारले आहेत. भाजप एकीकडे पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या अंगावर फुलं टाकली आणि दुसरीकडे आम्हाला हिंदूत्व शिकवत आहेत, अशी टीका केली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सगळ्या मुद्द्यांना भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे सध्या पन्नास ठिगळं लावून गोधडी विणत आहेत, एखादा आपल्या विचारांशी किती प्रतारणा करु शकतो, याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, परंतु ते स्वतः मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला. राम मंदिर वर्गणीची चेष्टा उद्धव ठाकरे यांनी केली.” अशी टीका त्यांनी केलीय.
पाकिस्तानी खेळाडूंवरील टीकेवर बोलताना शेलार म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागतात भाजप आणि बीसीसीआयचा सबंध नाही तो इव्हेंट आयसीसीचा होता. याकूब मेमनच्या थडग्याला फुलं घातली, त्या उद्धव ठाकरे यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, असा जोरदार प्रतिहल्ला आशिष शेलारांनी ठाकरेंवर केला.