राहुल-अय्यर कमबॅक, फिरकीचा जादूगार आउट, ‘या’ दोन सरप्राईज, Asia Cup साठी भारताचे शिलेदार जाहिर
Asia Cup 2023 Team India Squad : आशिया चषकासाठी बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक असताना भारतीय संघ जाहीर होणे बाकी होते. मात्र, आज कुठे निवड समितीला मुहुर्त मिळाला आहे. आज 1ः30 वाजता अजित आगरकरच्या नेतृत्वातील भारतीय निवड समितीने 17 खेळाडूंची घोषणा केली आहे. आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातील खेळाडूच वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. त्यामुळे आजच्या निवडीकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते.
राहुल-अय्यरचे पुनरागमन
केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे आशिया कपसाठी पुनरागमन झालं आहे. जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. त्यामुळे या तळ्यात-मळ्यात असणाऱ्या खेळाडूंचे अनेक महिन्यानंतर पुनरागमन झाले आहे.
तिलक शर्मा-प्रसिद्ध कृष्णाच्या रुपाने सरप्राईज
मधल्या फळीतील फंलदाज म्हणून तिलक शर्मा व प्रसिद्ध कृष्णा यांच्या रुपाने क्रिकेटप्रेमींना सरप्राईज मिळाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. तिलक याने पहिल्या मालिकेत दमदार फलंदाजीने खूप प्रभावित केले.
युजवेंद्र चहल आउट
कुलदीप यादवला मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळाली असल्याने युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीत बुमराह, सिराज आणि शमीची निवड निश्चित करण्यात आली आहे. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांनी जागा निश्चित केली आहे.
आशिया चषकासाठी भारताचे शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, (उपकर्णधार) सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा