जय शाह पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी Pakला जाणार? PCBच्या आमंत्रणाचा मान राखणार!
Asia Cup Math PCB Invite Jai Shah : भारत अन् पाकिस्तान हे एकमेकांचे पक्के वैरी आहेत. हे आजपर्यंतच्या अनेक घटनांवरून दिसून आले आहे. मात्र, आता हे वैर शमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याला कारण ठरले या महिन्यात सुरु होणारी आशिया कप 2023 स्पर्धा. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय सचिव जय शहा यांना आशिया कप 2023 चा उद्घाटन सामना पाहण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे.
अनेक वादानंतर ही स्पर्धा पार पडणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या 30 ऑगस्ट 2023 रोजीच्या सामन्याने या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हाच सामना पाहण्यासाठी शहा यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आता शहा पाकिस्तानला जातात का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी डरबन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत जय शाह यांना पाकिस्तानला भेट देण्याचे तोंडी निमंत्रण दिले होते. यानंतर आता पुन्हा एकदा पीसीबीने शहा यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शाह यांना निमंत्रण पाठवले आहे, मात्र बीसीसीआयचे सचिव पाकिस्तानात जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानी माध्यमांवर विश्वास ठेवला तर शाह यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले आहे. परंतु एका अहवालानुसार, बीसीसीआयच्या सचिवाने हा दावा साफ फेटाळून लावला आणि त्यांच्या पाकिस्तानात जाण्याची आशा फारशी दिसत नाही.